सिल्लोड येथे थोरले बाजीराव पेशव्यांची जयंती उत्साहात साजरी

सिल्लोड येथे थोरले बाजीराव पेशव्यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

सिल्लोड येथे थोरले बाजीराव पेशव्यांची जयंती उत्साहात साजरी  मुख्य फोटो
सिल्लोड येथे थोरले बाजीराव पेशव्यांची जयंती उत्साहात साजरी  अतिरिक्त फोटो

सिल्लोड येथे थोरले बाजीराव पेशव्यांची जयंती उत्साहात. सिल्लोड, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने सुरू असलेल्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाचे औचित्य साधून सिल्लोड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान, सिल्लोड-सोयगाव’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मकरंदजी कोरडे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमास अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, राज कम्प्युटरचे संचालक सचिन उपळीकर, पत्रकार संजय कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, निलेश सोनटक्के यांच्यासह गणेश झाल्टे, योगेश जोशी, अमोल कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, मयूर कुलकर्णी, विवेक व्यवहारे, अजय इंगे, वैभव जोशी, अनिल भाले, रोहित कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी, पद्माकर नागपुरे, अनिल गोमटे, उदय सुरडकर, शंतनू सुरडकर, नागेश व्यवहारे, प्रणव इंगे, रुद्र कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशपांडे, स्वाती पालोदकर, जयश्री उपळीकर, स्वाती कुलकर्णी, कोमल वैभव जोशी, सारिका योगेश कुलकर्णी, जयश्री अमित कुलकर्णी, भारती योगेश रोडे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकात योगेश रोडे यांनी अमृतच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी अमृतच्या स्वयंरोजगार, व्याज परतावा योजनेसह विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिल भाले, योगेश जोशी, सचिन उपळीकर, योगेश रोडे आणि मकरंद कोरडे यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रावर, पराक्रमावर, नेतृत्वगुणांवर आणि कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. बाजीराव पेशवे यांनी अल्पावधीत आपल्या धाडसी नेतृत्वाने मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य, निर्णयक्षमता आणि ध्येयासाठीची निष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

योगेश रोडे यांनी आपल्या मनोगतात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची माहिती देत, इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून युवकांनी नेतृत्व, ध्येयवाद आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. तर मकरंद कोरडे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिल्लोड-सोयगाव परिसरात इतिहास, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि युवकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. पराक्रम दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे इतिहासाची प्रेरणा आणि युवकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाली. त्यामुळे उपस्थित युवक व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात व्याख्याने, इतिहासविषयक उपक्रम, युवक मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम आणि विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास नागरिक, युवक व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अमृत विविध योजनांच्या माहितीसाठी संपर्क 7391065475,9403200606


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement