कोल्हापूरमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहाने संपन्न

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने कोल्हापूर मध्ये करवीर नगर वाचन मंदिर येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस म्हणजेच यावर्षीपासूनच साजरा होणाऱ्या पराक्रम दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कोल्हापूरमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहाने संपन्न मुख्य फोटो
कोल्हापूरमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहाने संपन्न अतिरिक्त फोटो

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने कोल्हापूरमधील करवीर नगर वाचन मंदिर येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस म्हणजेच या वर्षीपासूनच साजरा होणाऱ्या अमृत पराक्रम दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयीची सखोल माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्राध्यापक मा. श्री. प्रकाश इनामदार सर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्याम जोशी उपस्थित होते.


या कार्यक्रमामधून इनामदार सर यांनी आपल्या प्रभावशाली व्याख्यानातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी इतिहासातील सर्व बारकावे व खुलासे देत, पुस्तकांचा आधार घेत त्यांचा जीवनप्रवास, संघर्ष व युद्धनीती मांडून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर श्याम जोशी यांनी महासंघाबद्दलची माहिती देऊन यापुढे देखील हा उपक्रम आम्ही एक उत्सव म्हणून दरवर्षी साजरा करू, असे सर्वांना आश्वस्त केले व आजवर केलेल्या महासंघाच्या कामाचा आढावा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. शहराध्यक्ष श्री. गुरुप्रसाद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे व व्याख्यात्यांची ओळख करून दिली व कार्यक्रमाची संकल्पना मांडली.


त्याचबरोबर अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी अमृत या संस्थेविषयीची सर्व माहिती व हाती घेतलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला शहरासह इतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 12:54 PM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 12:54 PM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement