मालेगाव येथे "अपराजीत योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे" यांच्या 326 वी जयंती अमृत पराक्रम दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
मालेगाव :शासकीय आयटीआय मालेगाव येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती साजरी करण्यात आली
"अपराजीत योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे" यांच्या 326 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा व्यवस्थापक दिपक गुप्ता यांनी प्रास्ताविक करत अमृत संस्थेच्या सर्व योजना याविषयी सविस्तर माहिती देत बाजीराव पेशवे यांच्या चालू असलेले उपक्रम याविषयी माहिती दिली.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून दिलीप बोथरा सोबत रमेश उचित, प्राचार्य प्रकाश जैन सर होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment