श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कलेढोण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अखंड भारताच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने आणि रणकौशल्याने मराठा साम्राज्याचा ध्वज संपूर्ण भारतात फडकवणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कलेढोण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख करून दिली. "थोरले बाजीराव पेशवे हे केवळ एक कुशल सेनापती नव्हते, तर गनिमी कावा आणि रणनीतीमध्ये अजोड असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यात ४१ लढाया लढल्या आणि एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही. त्यांचा हाच जिद्द, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा वारसा आजच्या तरुण पिढीने अंगीकारणे गरजेचे आहे." इतिहासाच्या या प्रेरणादायी प्रवासानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अमृत मार्फत घेण्यात येणाऱ्या निबंध, वक्तृत्व आणि रील स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment