अमृत संस्थेतर्फे मुंबई मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी

मराठा साम्राज्याचे रणधुरंधर आणि पराक्रमी सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती अमृत संस्थेच्या वतीने मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी माटुंगा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

अमृत संस्थेतर्फे मुंबई मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी मुख्य फोटो
अमृत संस्थेतर्फे मुंबई मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी अतिरिक्त फोटो

अमृत संस्थेतर्फे थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी माटुंगा: मराठा साम्राज्याचे रणधुरंधर आणि पराक्रमी सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती अमृत संस्थेच्या वतीने मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी माटुंगा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संध्याकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला इतिहासप्रेमी, नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मोडी लिपी अभ्यासक तसेच पूर्वकलीन नाणी जोपासक विवेक मयेकर सर उपस्थित होते. त्यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या युद्धनीती, प्रशासकीय कौशल्य आणि स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

मोडी लिपीतील दुर्मिळ कागदपत्रे आणि पेशवाई काळातील नाण्यांविषयीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यामुळे इतिहासाला प्रत्यक्ष स्पर्श केल्यासारखा अनुभव सगळ्यांना आला.

बाजीराव पेशव्यांच्या "वेग, धैर्य आणि राष्ट्रप्रथम" या विचारांनी आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, असा उद्देश या जयंती साजरी करण्यामागे असल्याचे अमृत संस्थे मार्फत सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि "हर हर महादेव" च्या जयघोषाने झाली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 11:12 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 11:12 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement