छत्रपती संभाजीनगर येथील कन्व भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजीनगर येथील कन्व भवनात ब्राह्मण महिला मंचच्या वतीने आयोजित ‘यशस्विनी उद्योजिका समूह’ प्रदर्शनस्थळी अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील कन्व भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन  मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथील कन्व भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर:- कन्व भवन येथे ब्राह्मण महिला मंच, छत्रपती संभाजीनगर यशस्विनी उद्योजिका समूह या प्रदर्शनाच्या ठिकाणी अमृत पराक्रम दिनानिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य विस्तारातील त्यांच्या कामाची आठवण करण्यात आली. आपल्या पराक्रमाने हिंदुत्वाचा भगवा दूरवर नेणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्या कार्यातून आजच्या तरुणांनी आणि नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके, अमृतची जिल्हा टीम, ब्राह्मण महिला मंचच्या महिला पदाधिकारी तसेच प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला उद्योजिका उपस्थित होत्या. अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 10:15 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 10:15 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement