अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त अमृततर्फे कार्यक्रम आयोजित
पालखेड, ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले. पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पालखेडच्या ऐतिहासिक भूमीला श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची विशेष ओळख आहे. याच ऐतिहासिक पालखेडच्या भूमीत श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.
निजामाविरुद्धच्या पालखेडच्या लढाईत बाजीराव पेशवे यांनी आपल्या युद्धकौशल्याने आणि धाडसी रणनीतीने विजय मिळवला. त्यामुळे पालखेडचा विजय हा त्यांच्या पराक्रमाचा आणि नेतृत्वाचा महत्त्वाचा इतिहास मानला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देत उपस्थितांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवे स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर पा. जाधव, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, भरत कापरे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके, शाळेचे सचिव विजय कुमावत, मुख्याध्यापक संजय गुंजाळ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ:https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment