नायगावच्या 'पीएम श्री' शाळेत श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी झाली.
नायगावमध्ये शाळा-महाविद्यालयांत श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात संपन्न नायगाव (नांदेड) श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 'अमृत' संस्थेच्या वतीने आज राज्यभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नायगाव येथील 'पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक (कन्या) शाळेत' या कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अनेक विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निबंध व वक्तृत्व स्पर्धेत अतिशय उत्साहाने भाग घेतला.
मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षीस वितरण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांचाळ सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून 'अमृत' संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (IMC) सदस्य श्री. लक्ष्मण बुद्धलवाड सर आणि सहशिक्षक श्री. खडकीकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. खडकीकर यांनी केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शालेय स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
बाजीराव पेशव्यांच्या शौर्यगाथेला उजाळा बक्षीस वितरण समारंभानंतर ५ विद्यार्थिनींनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय पराक्रमावर आणि शौर्यगाथेवर आपली मते मांडली.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. विश्वेश्वर जोशी यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच 'पराक्रम दिन' स्पर्धेत विद्यार्थिनींनी दाखवलेल्या उत्कृष्ट सहभागाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण
इतिहास अभ्यासक म्हणून सुवर्णपदक प्राप्त असलेले मुख्याध्यापक श्री. पांचाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धकौशल्यावर आणि इतिहासावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.
समारोप आणि आभार
श्री. साईनाथ कुलकर्णी सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मावार सर, पतंगे सर, सौ. देशमुख मॅडम, नुककुलवार मॅडम आणि ढाकरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment