आता गरज आहे ती थोरल्या बाजीरावांचा कर्तृत्ववारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची !

श्रीमंत थोरले बाजीराव जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमीत अर्थात नाशिक जिल्ह्यातील डुबेरे या गावी साजरा करण्यात आलेल्या उत्साहवर्धक कार्यकमात मान्यवरांनी व्यक्त केली भावना!

आता गरज आहे ती थोरल्या बाजीरावांचा कर्तृत्ववारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची ! मुख्य फोटो
आता गरज आहे ती थोरल्या बाजीरावांचा कर्तृत्ववारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची ! अतिरिक्त फोटो

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अवघे जीवनच मातृभूमीसाठी समर्पित होते. वयाच्या १३ व्या वर्षी युद्धक्षेत्रात जाणे, वयाच्या विसाव्या वर्षी मिळालेली पेशवेपदाची जबाबदारी हे सर्व त्यांनी लीलया पेलले. त्यांनी लढलेली प्रत्येक लढाई ही येणाऱ्या पिढ्यांसाठी परिणामकारक युद्धनीतीचा आदर्श वस्तूपाठच आहे. आपण सगळे 'भारतमाता की जय' असे म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने त्या भारतभूमीची अखंड आणि आजन्म सेवा करणारे फारच थोडे पराक्रमी वीर असतात, त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, अशा शब्दात अमृत या संस्थेचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांनी त्यांचा गौरव केला. त्यांनी पुढे बोलताना त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्याची आत्यंतिक गरजही व्यक्त केली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मभूमीत, अर्थात डुबेरे या गावी आयोजित अत्यंत देखण्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात वक्ते आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज मा. चंद्रशेखर बर्वे यांनी थोरल्या बाजीरावांचा अवघा जीवनपट उलगडून दाखवला. त्यांना जी साम्राज्य विस्ताराची जबाबदारी मिळाली होती, ती शक्ती आणि बुद्धी यांच्या जोरावर त्यांनी कशी लीलया पार पाडली, याची सोदाहरण मीमांसा त्यांनी केली.

हा कार्यक्रम डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या संयोजनाने पार पडला. यावेळी नाशिक येथील भोसला मिलीटरी स्कूलचे अत्यंत दिमाखदार संचलन झाले. सिन्नर येथील शेठ ब.ना. सारडा विद्यालय, डुबेरे येथील जनता विद्यालय, डुबेरे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जनता विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या भव्य कार्यक्रमात थोरल्या बाजीरावांच्या स्मृतींनी अवघे सभागृह रोमांचित झाले होते.

यावेळी डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला तो वाडा, ती खोली, तेथील वातावरण आणि तिथे नमूद केलेली पेशवे घराण्याची वंशावळ हे सर्व पाहताना त्या थोर विभूतीचे स्मरण होत होते.

याप्रसंगी अमृत संस्थेतर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची सुंदर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 06:52 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 06:52 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement