अमृत जिल्हा कार्यालयात श्रीमंत पेशवे बाजीराव (प्रथम) यांची ३२६ वी जयंती अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या अतुलनीय पराक्रमास अभिवादन करण्यात आले.
अमृत जिल्हा कार्यालयात श्रीमंत पेशवे बाजीराव (प्रथम) यांची ३२६ वी जयंती अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बाजीराव पेशव्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना वक्त्यांनी सांगितले की, बाजीराव पेशवे हे केवळ एक कुशल सेनापती नव्हते, तर एक दूरदृष्टी असलेले अद्वितीय संघटक आणि विचारवंत होते. त्यांनी सैन्यात व प्रशासनात स्थान देताना जाती-पातीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले आणि शिंदे, होळकर, पवार, गायकवाड यांसारख्या कर्तबगार तरुणांना एकत्र आणून मराठा सत्तेचे मजबूत आधारस्तंभ बनवले.
"मुळावर घाव घातल्यास फांद्या आपोआप गळून पडतील" या त्यांच्या आक्रमक रणनीतीने आणि गतिमान विचारसरणीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर केला. आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास दाखवून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतवण्याचे त्यांचे हे संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि ध्येयवादी विचार आजही समाजासाठी व युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.
या कार्यक्रमास ब्राह्मण कल्याण ट्रस्ट (धाराशिव) आणि ब्राह्मण महासंघ या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाहक श्री. विश्वास कांबळे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अर्जुन बारंगुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच अमृत परिवारातील व्यवस्थापक श्री. चिन्मय कुलकर्णी, उपव्यवस्थापक श्री. अजय कुलकर्णी, अमृत सखी सौ. कल्याणी सराफ आणि अमृत मित्र श्री. रवि वैद्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment