रत्नागिरीत पाच जानेवारीपासून सुरू होणार अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम

१८ दिवसांचे निःशुल्क प्रशिक्षण

रत्नागिरीत पाच जानेवारीपासून सुरू होणार अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

रत्नागिरी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याची पहिली बॅच पाच जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी १८ दिवसांचा असणार आहे.

बेकरी उद्योगामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच युवक, महिला व नवउद्योजकांना कौशल्याधारित प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने अमृत संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात केक, ब्रेड, बिस्किटे, पेस्ट्री, खारी इत्यादी बेकरी पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच बेकरी व्यवसाय सुरू करताना लागणारी उपकरणे, कच्चा माल, खर्चाचे नियोजन, पॅकिंग, ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य व आत्मविश्वास मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी अमृत संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत रत्नागिरी जिल्हा कार्यालय,
प्लॉट नं १७, घर नंबर ७०७/ड ४,
माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पाठीमागे,
हॉटेल सिंधुदुर्गसमोर, साळवी स्टॉप,
रत्नागिरी - ४१५६१२
मोबाइल नं : 9112228761
ई-मेल - amrut.ratnagiri.dm@gamil.com

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 12:38 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 12:38 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words