उद्योजकतेची नवी दिशा; अमृतच्या EDP प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने चंद्रपूर कार्यालयात EDP (Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उद्योजकतेची नवी दिशा; अमृतच्या EDP प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन मुख्य फोटो
उद्योजकतेची नवी दिशा; अमृतच्या EDP प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश प्रशिक्षणार्थींमध्ये उद्योजकतेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती देणे तसेच उपलब्ध व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान व्यवसायाची निवड, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन आणि उद्योजक म्हणून आवश्यक असणारी कौशल्ये याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.


यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध स्वयंरोजगार व उद्योजकता विकास योजनांची माहिती, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तसेच उपलब्ध आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली दिशा मिळण्यास मदत झाली.


प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी विविध विषयांवर प्रश्न विचारून संवाद साधला. मार्गदर्शनाला प्रशिक्षणार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून येत होता. स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्याची इच्छा असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


उद्योजकतेच्या माध्यमातून युवक व नागरिकांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची भूमिका महत्त्वाची असून, EDP प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. अधिक माहिती साठी संपर्क - 9112228774

अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय

पत्ता - कृष्णा टावर जवळ, गुरुद्वारा रोड तुकूम, चंद्रपूर

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 05:09 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

O
Omkar bhau bolte
18-08-2026 07:53 PM

लड़कत जी च्या नंतर EDP अरे waaa किती छान संकल्पना आहे चंद्रपूर मध्ये गाजविणार EDP उत्तम

Write a Comment
0 / 50 words
Advertisement