श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी आपल्या असामान्य युद्धकौशल्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे धाडस, नेतृत्व आणि स्वाभिमानाची भावना आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी -अशी मान्यवरांनी व्यक्त भावना
जालना : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा वारसा पुढे नेत, आपल्या अद्वितीय शौर्याच्या, पराक्रमाच्या आणि कुशल नेतृत्वाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२६ वी जयंती जिल्हा कार्यालय, अमृत, जालना येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पराक्रमी कार्याचे स्मरण करत त्यांच्या शौर्याबद्दल, राष्ट्रनिष्ठेबद्दल, नेतृत्वगुणांबद्दल आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आदर व्यक्त केला.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी आपल्या असामान्य युद्धकौशल्याच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे धाडस, नेतृत्व आणि स्वाभिमानाची भावना आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमास श्री. दीपक रणनवरे (पेशवा युवा मंच अध्यक्ष), संतोष दानी, नीलकंठ कुलकर्णी, सतीश देशपांडे, अरविंद देशपांडे, मधुसूदन दंडारे, स्वप्नील जोशी, भाजप नगरसेवक वैजनाथ राऊत, सुनील झोर, अमित कुलकर्णी, प्रसाद जोशी, विनोद मावकर, अमित कुलकर्णी (ब्रह्मास्त्र संस्था अध्यक्ष), दिलीप पोहनेरकर, नागेश कुलकर्णी, अनिरुद्ध काटे (जिल्हा व्यवस्थापक, अमृत, परभणी), अमृत मित्र अक्षय कुलकर्णी, अमृत सखी जान्हवी देशपांडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.
पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन!
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment