नांदेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि इतर महापुरुषांचा जीवनप्रवास उलगडणार पुस्तकांच्या माध्यमातून!

नांदेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी; या निमित्ताने अमृत वाचनालयाचा शुभारंभ

नांदेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि इतर महापुरुषांचा जीवनप्रवास उलगडणार पुस्तकांच्या माध्यमातून! मुख्य फोटो
नांदेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि इतर महापुरुषांचा जीवनप्रवास उलगडणार पुस्तकांच्या माध्यमातून! अतिरिक्त फोटो

नांदेड, दि. १८ ऑगस्ट २०२६ :* अमृत पराक्रम दिन तथा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय, नांदेड येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. याच निमित्ताने अमृत जिल्हा कार्यालयात *‘अमृत वाचनालय’* या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम व कार्यावर आधारित अमृत संस्थेचा विशेष व्हिडिओ व गीत दाखविण्यात आले.


यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *अमृत वाचनालयाचे उद्घाटन* करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे श्री. शशिकांत पाटील, श्री. राजेश देशमुख, संस्कार भारतीचे वाकोडकर सर तसेच दिगंबर जोशी यांनी उपस्थिती लावली. वाकोडकर सर व दिगंबर जोशी यांनी अमृत वाचनालयासाठी पुस्तके भेट देऊन या उपक्रमाला मोलाचे योगदान दिले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी* यांनी केली. यावेळी विभागीय उपव्यवस्थापक *श्री. ओंकारजी शेटे* यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. विशेषतः अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व EDP प्रशिक्षणातील लाभार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आभार प्रदर्शन *अमृत मित्र श्री. विश्वास बदापुरकर* यांनी केले. यावेळी नांदेडमधील उत्कृष्ट फोटोग्राफी क्षेत्रातील उद्योजक *श्री. आशीष पांडे* तसेच *ASNEH टेक्नॉलॉजी* चे संस्थापक श्री. आशीष सासट्टे यांचीही उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत संस्थेने आयोजित केलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचे आभार मानले. तसेच अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली.


*इतिहास, वाचन, विचार आणि उद्योजकतेची सांगड घालत नव्या पिढीला प्रेरणा देणारे ‘अमृत वाचनालय’ हे अमृत जिल्हा कार्यालय, नांदेडच्या उपक्रमांमध्ये निश्चितच एक मानाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरणार आहे.*


अशाप्रकारे अमृत जिल्हा कार्यालय, नांदेड येथे अमृत पराक्रम दिन तथा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 03:43 PM News publication time | Views: 397 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 03:43 PM News publication time | Views: 397 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement