आचार्य नगर येथील नर्मदेश्वर मंदिरात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
परभणी : आचार्य नगर येथील नर्मदेश्वर मंदिरात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी अद्वितीय पराक्रम गाजविणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्यनिष्ठेच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
अतिशय तरुण वयात पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारून श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याची पताका उत्तर हिंदुस्थानापर्यंत फडकावली. त्यांच्या युद्धनीतीमध्ये वेगवान हालचाली, अचूक नियोजन, धाडसी निर्णयक्षमता आणि शत्रूच्या हालचालींचा अचूक अंदाज यांचा प्रभावी संगम दिसून येतो. पालखेडची लढाई ही त्यांच्या असामान्य युद्धकौशल्याची ठळक साक्ष मानली जाते. रणनीतीच्या बळावर शत्रूला नमविण्याची त्यांची क्षमता त्यांच्या महान नेतृत्वाची प्रचिती देणारी होती.
यावेळी डॉ. केदार खटिंग (मनपा नगरसेवक, परभणी), दीपक कासांडे (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय पेशवा संघटना), प्रकाश डावरे, विजय देशमुख, डी. डी. कुलकर्णी, नाना कुलकर्णी, विजय शिरूरे, उद्धव कच्छवे, रोहित कोठीखाने, आदित्य देशपांडे, गजानन उपळकर, विशाल देशमुख, अभय देशपांडे, मनोज धर्माधिकारी, श्रीकृष्ण वसेकर, अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी, अमृत मित्र अनंतराव जोगदंड, मस्के राजेभाऊ, ओमकार कटारे, अनिल चाटोरीकर, मालेवार सर, स्वीय सहाय्यक प्रल्हाद पवार आदींची उपस्थिती होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment