श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या असामान्य शौर्य, धाडसी नेतृत्व, दूरदृष्टी आणि युद्धकौशल्याच्या बळावर मराठा साम्राज्याचा पताका उत्तर हिंदुस्थानापर्यंत नेली. अशा अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी झाली.
परभणी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा कार्यालय, परभणी येथे मराठा साम्राज्याचे विस्तारक, अद्वितीय पराक्रमी आणि अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या असामान्य शौर्य, धाडसी नेतृत्व, दूरदृष्टी आणि युद्धकौशल्याच्या बळावर मराठा साम्राज्याची पताका उत्तर हिंदुस्थानापर्यंत नेली. त्यांच्या पराक्रमाची, राष्ट्रनिष्ठेची आणि स्वराज्यविस्ताराच्या ध्येयाची प्रेरणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणी नगर कार्यवाहक अजय हमदापूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मंदार कुलकर्णी, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक कासांडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सतीश भातलवंडे, संघ स्वयंसेवक डी. डी. कुलकर्णी, अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृत मित्र अनंतराव जोगदंड, अमृत सखी मयुरी टेळकीकर, संदीप जोशी, संदीप शिंदेफळकर, नितीन शुक्ल, अनुलोमचे भाग जनसेवक गोविंद गोसावी, विनायक भोजने, सामाजिक कार्यकर्ते माधव खुणे, वैभव असोलेकर, महेश बडवे, पंकज पुरोहित, अनिल चाटोरीकर, ओमकार कटारे, माऊली वाकोडे, पेकम आदी मान्यवर उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment