इतिहासातून पराक्रमाची प्रेरणा-कोल्हापूर येथे आदर्श गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची ओळख

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), कोल्हापूर यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावजवळ मिणचे येथील आदर्श गुरुकुल अकॅडमी या निवासी शाळेत थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी जीवनकार्य व पराक्रमाची माहिती तसेच पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

इतिहासातून पराक्रमाची प्रेरणा-कोल्हापूर येथे  आदर्श गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची ओळख मुख्य फोटो
इतिहासातून पराक्रमाची प्रेरणा-कोल्हापूर येथे  आदर्श गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची ओळख अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), कोल्हापूर यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावजवळ मिणचे येथील आदर्श गुरुकुल अकॅडमी या निवासी शाळेत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याविषयी व पराक्रमाविषयी माहिती देण्यासाठी, तसेच पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आदित्य मैंदर्गीकर उपस्थित होते. ते कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत थोरले बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण, युद्धकौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा यांबाबत माहिती दिली. इतिहासातील या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्यातून आजच्या विद्यार्थ्यांनी कोणती प्रेरणा घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.


पराक्रम दिनानिमित्त अमृतच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या निबंध, वक्तृत्व, रील्स इत्यादी विविध स्पर्धांची माहिती विद्यार्थ्यांना अमृतच्या जिल्हा उपव्यवस्थापकांकडून देण्यात आली, तर जिल्हा व्यवस्थापकांकडून अमृत या संस्थेविषयी माहिती देण्यात आली. स्पर्धेचे स्वरूप, विषय, सहभागाची प्रक्रिया आणि या उपक्रमामागील उद्देश याबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ इतिहास वाचण्यापेक्षा तो समजून घ्यावा, त्यातील प्रेरणादायी मूल्ये आत्मसात करावीत आणि अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


आदर्श गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक घुगरे सर व घुगरे मॅडम तसेच सुतार सर आणि पाटील सर यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाला यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ७५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


शिक्षणाबरोबर शेती, तंत्रज्ञान आणि संस्कार


आदर्श गुरुकुल अकॅडमीमध्ये मॉन्टेसरीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. निवासी व अनिवासी अशा दोन्ही पद्धतीने जवळपास ३५०० पर्यंत इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञान, तांत्रिक उपकरणे, नवनवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या युगातील विविध संकल्पनांची माहिती दिली जाते.


इतिहास आणि संस्कृतीचा वारसा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी किल्ल्यांच्या प्रतिकृतींची बांधणी, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक विषयांवरील उपक्रम तसेच विविध क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न येथे केला जातो.


गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असून, एका विद्यार्थ्याला छत्तीसगड राज्यात एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी इस्रोला भेट दिली असून, यावर्षी अनेक विद्यार्थी अग्निवीर भरतीमध्ये देखील यशस्वीरित्या भरती झाले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश


थोरले बाजीराव पेशवे यांचे जीवन हे विद्यार्थ्यांसाठी ध्येय, धैर्य, नेतृत्व, युद्धकौशल्य आणि पराक्रम अशा गुणांमुळे प्रेरणादायी ठरणारे आहे. अशा गुणांचा अभ्यास इतिहासातून विद्यार्थ्यांनी करावा व असे गुण आत्मसात करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.


‘इतिहास जाणून घ्या, पराक्रमाची प्रेरणा घ्या आणि वर्तमानात आपल्या क्षमतेचा उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवा,’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला, असे काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अमृतच्या माध्यमातून निवासी शाळेत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याची ओळख होण्याबरोबरच पराक्रम दिनानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रेरणा मिळाली.


सदर स्पर्धेसाठी दिनांक १ ऑगस्ट २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्पर्धा प्रवेशिका पाठवणे अपेक्षित आहे. स्पर्धेचे स्वरूप, बक्षीस, नियोजन व इतर आवश्यक माहिती खाली नमूद केलेल्या वेब पेजवर मिळेल.

वेब पेज URL https://parakramdin.mahaamrut.org.in/#

अमृत जिल्हा कार्यालय कोल्हापूर संपर्क क्र .-९११२२२८७६४ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement