अमृत संस्थेच्या 'ईडीपी'प्रशिक्षणामुळे सोलापूर येथील पद्माकर पाटील यांच्या उद्योजकतेच्या स्वप्नाला बळ! स्वप्नाला बळ!
अमृत संस्थेच्या 'ईडीपी' प्रशिक्षणामुळे पद्माकर पाटील यांच्या उद्योजकतेच्या स्वप्नाला बळ! सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित १० दिवसीय 'अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP)' प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणामध्ये रामपूर (जि. सोलापूर) येथील रहिवासी पद्माकर अप्पाराव पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या १० दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत स्वतःचा व्यवसाय कसा उभा करावा, व्यवसायाचे नियोजन व व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावे, बाजारपेठेचा अभ्यास आणि विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयी अत्यंत सखोल आणि मोलाचे मार्गदर्शन पद्माकर पाटील यांना मिळाले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल पद्माकर पाटील यांना 'अमृत' संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास द्विगुणित झाल्याची भावना व्यक्त करत पद्माकर पाटील यांनी नवउद्योजकांना अशी व्यासपीठे अत्यंत मार्गदर्शक ठरतात असे सांगितले. तसेच या संधीबद्दल त्यांनी 'अमृत' संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१.
संपर्क:- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment