विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध जनकल्याणकारी योजनांची व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
ईश्वरपूर: ब्राह्मण सभा ईश्वरपूर व वाळवा तालुका ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील विविध परीक्षा आणि स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ईश्वरपूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध जनकल्याणकारी योजनांची व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या सत्कार समारंभास शैलेन्द्र जहागिरदार यांना अमृत संस्थेच्या कामकाजाची आणि विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, अमृत संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन, कौशल्य विकास (Skill Development) प्रशिक्षण कार्यक्रम आणि शैक्षणिक रोजगाराभिमुख योजना राबवल्या जात आहेत.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सर्व शासकीय व शैक्षणिक योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे निरसनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. मंजिरीताई गाडगीळ उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते आणि सांगली जिल्ह्यातील समाजातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच निर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सौ. मंजिरीताई गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजाने अशा गुणवंत पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप मारली पाहिजे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा ईश्वरपूर व वाळवा तालुका ब्राह्मण संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अधिक माहिती साठी संपर्क :
९११२२२८७६६ / ७०५७६०७४१९/७९७२८३०७५७
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६ अमृत संस्थेविषयी अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment