सांगलीत सिंधी समाजाच्या वार्षिक सभेत 'अमृत'च्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन

सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

सांगलीत सिंधी समाजाच्या वार्षिक सभेत 'अमृत'च्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन मुख्य फोटो
सांगलीत सिंधी समाजाच्या वार्षिक सभेत 'अमृत'च्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

सांगली, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ : येथील सिंधी समाजाच्या प्रसिद्ध सिंधू सांस्कृतिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधू सांस्कृतिक भवन येथील श्री गुरुनानक हॉलमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.

या सभेच्या व्यासपीठावरून समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. या सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवकुमार झुमराणी यांनी विशेष निमंत्रित म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी अमृत संस्थेचे शैलेन्द्र जहागिरदार यांना पाचारण केले होते.

उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना अमृत संस्थेची ध्येयधोरणे, रोजगाराभिमुख उपक्रम, युवक-युवतींसाठीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध घटकांसाठी असलेल्या जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यावा?अर्जाची प्रक्रिया काय आहे ?आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?याचे सविस्तर स्पष्टीकरण या वेळी करण्यात आले.

मार्गदर्शनानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित सभासदांनी अमृत संस्थेच्या योजनांविषयी विविध प्रश्न विचारले. या सर्व शंकांचे निरसन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवकुमार झुमराणी होते. सभेला संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि १८० हून अधिक सभासद उपस्थित होते. सभेच्या शेवटी समाजाच्या विकासासाठी आणि युवा पिढीला स्वावलंबी बनवण्यासाठी अमृतच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

अधिक माहिती साठी संपर्क :

९११२२२८७६६ / ७०५७६०७४१९/७९७२८३०७५७

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)

अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,

राजवाडा, सांगली ४१६४१६


अमृत संस्थेविषयी : अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: शैलेन्द्र जहागिरदार News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: शैलेन्द्र जहागिरदार News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement