अहिल्यानगर मधील कोपरगाव तालुका येथे "अमृत पेठचे आयोजन दिनांक १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
अहिल्यानगर :- महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्था अंतर्गत लघु उद्योजिकांसाठी "अमृत पेठ थेट बाजारपेठ" चे आयोजन अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. हे प्रदर्शन दोन दिवसीय होते.याचे उदघाटन मा.श्री.विवेकभैय्या कोल्हे (आमदार, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मा.श्री.परागजी संधान (नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपरिषद),मा.श्री.संजयराव सातभाई (मा.नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपरिषद),मा.श्री.सत्येन मुंदडा (मा.चेअरमन,दि.पिप्लस को.ऑप बँक),मा.श्री.प्रसाद नाईक (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक,कोपरगाव),मा.श्री.मकरंद कोन्हाळकर (अध्यक्ष, ब्राम्हण सभा,कोपरगाव)त्याचप्रमाणे मा.श्री.मंगेश खाडिलकर (विभागीय व्यवस्थापक-अमृत) व मा.श्री.सागर भोपे (जिल्हा व्यवस्थापक- अमृत) आदी मान्यवर यांच्या उपस्तिती मध्ये पार पडले.
अमृत पेठ थेट बाजारपेठ मध्ये एकूण २० लघुउद्योजकांनी आपला स्टॉल सह सहभाग घेतला. हे प्रदर्शन दि १५ ऑगस्ट व दि १६ ऑगस्ट असे २ दिवसांसाठी होते.कोपरगावकरांनी येथे खरेदीचा आनंद घेत समाधान व्यक्त केले.मा आमदार श्री विवेकभैय्या कोल्हे यांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत नेहमी सहकार्य करण्याची सकारात्मकता दाखवली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री सागर भोपे यांनी केले. अमृत संस्थेविषयीची सविस्तर माहिती अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक श्री मंगेश खाडिलकर यांनी दिली तर ही बाजारपेठ यशस्वी करण्यासाठी अमृतमित्र श्री संदिप देशपांडे यांनी परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार ब्राह्मण सभा-कोपरगाव चे अध्यक्ष श्री मकरंद को-हाळकर सर यांनी मानले.
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment