मालेगावात २२ ऑगस्टपासून अमृतपेठ महोत्सव

दिनांक २२, २३ व २४ ऑगस्ट भव्य प्रदर्शन व विक्री; विविध वस्तूंच्या खरेदीची मालेगावकरांना पर्वणी

मालेगावात २२ ऑगस्टपासून  अमृतपेठ महोत्सव मुख्य फोटो
मुख्य फोटो

मालेगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने मालेगाव येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ – भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. २२, २३ आणि २४ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसांत बालगंधर्व मंगल कार्यालय, सोमवार बाजार कॅम्प, मालेगाव, जि. नाशिक येथे हा महोत्सव होणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. प्रदर्शनात ज्वेलरी, आकर्षक बांगड्या, हॅन्डमेड दागिने, आयुर्वेदिक उत्पादने, हर्बल उत्पादने, आकर्षक साड्या, विविध प्रकारचे ड्रेसेस, लहान मुलांसाठी खेळणी तसेच विविध खाद्यपदार्थ यांसह अनेक वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. अमृतपेठच्या माध्यमातून लघुउद्योजक, महिला उद्योजक आणि विविध प्रकारची उत्पादने तयार करणाऱ्या उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून स्थानिक उत्पादक व उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते. हे प्रदर्शन सकाळी ९.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी तसेच विविध स्थानिक व आकर्षक उत्पादनांची माहिती घेण्यासाठी मालेगावकरांनी आपल्या कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दिनांक : २२, २३ व २४ ऑगस्ट २०२६ स्थळ : बालगंधर्व मंगल कार्यालय, सोमवार बाजार कॅम्प, मालेगाव वेळ : सकाळी ९.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क - ९११२२२८७७०


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 04:18 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 04:18 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement