यशश्री मुळे यांनी उभा केला स्वतःचा व्यवसाय!
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या उद्योजकता विकास आणि कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेत यशश्री मुळे यांनी स्वतःचा ‘रुचिरा क्लाऊड किचन’ व्यवसाय सुरू केला आहे. प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करून त्यांनी व्यवसाय उभा केला असून आज त्या चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय चालवत आहेत.
यशश्री मुळे यांनी अमृतच्या उद्योजकता विकास व कौशल्य प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कसा सुरू करायचा, व्यवसायाचे नियोजन कसे करायचे, ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय कसा पोहोचवायचा आणि व्यवसायाची पुढे वाढ कशी करायची, याबाबत प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी क्लाऊड किचन व्यवसायाची निवड करून प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केली.
व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या भांडवलासाठी त्यांनी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले आणि त्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. देवगिरी बँकेच्या व्यवस्थित हप्ते देखील त्यांचे भरणे चालू आहेत आणि त्यांना आता त्याचा व्याज परतावा देखील मिळणार आहे.
मेहनत, योग्य नियोजन आणि अमृतच्या प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर आज त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महाराष्ट्र शासनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजयजी जोशी, अमृतचे राज्य व्यवस्थापक श्री. दीपक जोशी, मराठवाडा विभागीय व्यवस्थापक श्री. अमित सामंत, पुणे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रथमेश कुलकर्णी, मराठवाडा विभाग उपव्यवस्थापक श्री. ओंकार शेटे आणि अमृत छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक श्री. अक्षय लंबे यांनी यशश्री मुळे यांच्या ‘रुचिरा क्लाऊड किचन’ला भेट दिली.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक विजयजी जोशी यांनी मुळे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या व्यवसायाची माहिती घेतली. व्यवसाय कसा सुरू केला, त्यासाठी कोणत्या अडचणी आल्या आणि अमृतच्या प्रशिक्षणाचा व्यवसाय उभारण्यासाठी कसा फायदा झाला, याबाबत त्यांनी जाणून घेतले. यशश्री मुळे यांच्या या यशाबद्दल विजयजी जोशी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment