अमृत पराक्रम दिना’निमित्त धुळे येथील जो. रा. सिटी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन

अमृत पराक्रम दिना’च्या उपक्रमाची जो. रा. सिटी हायस्कूलमध्ये जनजागृती

अमृत पराक्रम दिना’निमित्त धुळे येथील जो. रा. सिटी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

धुळे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘अमृत पराक्रम दिना’ निमित्त जो. रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ‘अमृत पराक्रम दिना’ अंतर्गत ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी धुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून अमृतचे धुळे जिल्हा व्यवस्थापक श्री हेमंत पाठक यांनी जो. रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे भेट देऊन येथील मुख्याध्यापिका यांना उपक्रमाबाबतचे पत्र देण्यात आले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व शिक्षकांना उपक्रमाची माहिती देण्यात आली.

यावेळी जो. रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती देऊन विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांनी इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

इतिहासातून प्रेरणा, पराक्रमातून ऊर्जा आणि राष्ट्रनिष्ठेतून नव्या पिढीची घडण, हा ‘अमृत पराक्रम दिना’मागील प्रमुख उद्देश असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - ९११२२२८७७२

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 01:44 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 01:44 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement