अकोला जिल्ह्यातील ‘अमृत पेठ - २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विविध स्टॉल्सवर नागरिकांची गर्दी; उद्योजकांना मिळाला उत्तम व्यावसायिक प्रतिसाद

अकोला जिल्ह्यातील ‘अमृत पेठ - २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
अकोला जिल्ह्यातील ‘अमृत पेठ - २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

अकोला येथील गजानन महाराज मंदिर, धाबेकर नगर, खडकी येथे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘अमृत पेठ -२०२६’ ला अकोलेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर नागरिकांनी मोठ्या संख्येने बाजारपेठेला भेट देत विविध स्टॉल्सवर खरेदी केली. त्यामुळे सहभागी व्यावसायिक व उद्योजकांना चांगला व्यवसाय मिळाला.

अमृत पेठमध्ये विविध प्रकारच्या वस्तू व उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, घरगुती वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने तसेच विविध आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यासोबतच गौरक्षण संस्थेच्या विविध उत्पादनांचाही स्वतंत्र स्टॉल बाजारपेठेत लावण्यात आला होता. गौरक्षणच्या उत्पादनांविषयी नागरिकांनी उत्सुकतेने माहिती घेतली आणि या उत्पादनांना चांगली पसंती दिली.

एकाच ठिकाणी विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह बाजारपेठेला भेट देत खरेदीचा आनंद घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती, तर सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत विशेष गर्दी झाली.

विविध स्टॉल्सवर झालेल्या चांगल्या विक्रीमुळे सहभागी व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक व्यावसायिकांना ग्राहकांशी थेट जोडण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ हे उपयुक्त व्यासपीठ ठरले.

नागरिकांचा भरभरून प्रतिसाद, विविध उत्पादनांची झालेली चांगली विक्री तसेच गौरक्षणच्या उत्पादनांना मिळालेली पसंती यामुळे ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ २०२६’ चे आयोजन यशस्वी ठरले.

अधिक माहितीसाठी- ९११२२२७६३६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 12:20 PM News publication time | Views: 1,307 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 12:20 PM News publication time | Views: 1,307 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement