स्वातंत्र्यदिनानिमित्त शारदा अकॅडमी, फलटण येथे अमृतवर्गाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण येथे अमृतवर्गाचे आयोजन
फलटण : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फलटण येथील शारदा अकॅडमीमध्ये अमृतवर्गाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती तसेच देशाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विशेष अमृतवर्ग घेण्यात आला.
या अमृतवर्गामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर घोषवाक्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत भारतमातेप्रती आपला आदर व राष्ट्रप्रेम व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रहितासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा देण्यात आली.
अमृतवर्गातील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, ‘देशासाठी आपण काय करू शकतो?’ याचा सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने अमृतवर्गात सहभाग घेतला.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment