इतिहास अभ्यासक आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या मामांचे वंशज श्री चंद्रशेखर बर्वे यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा करून दिला परिचय
१४ ऑगस्ट २०२६ रोजी सिन्नर येथील निर्मलाताई कुलकर्णी माध्यमिक विद्यालय,सिन्नर येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या अमृत पराक्रम दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी इतिहास अभ्यासक आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या मामांचे वंशज श्री चंद्रशेखर बर्वे यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान, त्यांचे बालपण, त्यांचं युद्ध कौशल्य, रणनीती, हजरजबाबीपणा, समय सूचकता ,नेतृत्व, स्वामीनिष्ठ स्वभाव व त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग याविषयी गोष्टी रूपाने माहिती आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिली.
तसेच अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व व रील स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जेजुरकर मॅडम, शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९११२२२८७७०
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment