३१ जुलै २०२६ , रोजी के.एल .पोंदा हायस्कूल, डहाणू येथे अमृत वर्ग घेण्यात आला .शाळेत एकूण १३०० विद्यार्थी आहेत त्यातील ५वी ते १० एकूण ९६ चे प्रशिक्षण घेतले .
डहाणू येथे 'अमृत वर्ग' उपक्रमाचा शानदार समारोप; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ डहाणू, ३१ जुलै २०२६ , दी डहाणू एड्युकेशन ट्रस्ट संचालित के. एल. पोंदा. हायस्कूल . जिल्हा : पालघर ,तालुका : डहाणू येथे 'अमृत वर्ग' या विशेष शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाची उत्साहात सांगता झाली. या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, हा या अमृत वर्गाचा मुख्य उद्देश होता. २ तास चालेल्या या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि लोकनृत्य सादर केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ .रसिका घागस , शिक्षक श्री .शशिकांत चव्हाण ,श्री .चंद्र्कांत खुताडे ,श्री . तुषार मडवे ,श्री. बालासाहेब चव्हाण ,शिक्षिका सौ .मनीषा गोसावी उपस्थित होते.
शिक्षकांनी मार्गदर्शनात सांगितले की, या अमृत वर्गामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे. शाळेतील एकूण १३०० पैकी ९६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री . कैलास कुरकुटे ह्यांनी प्रशिक्षण दिले . कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षित विद्यार्थ्यांना अमृत वर्ग कार्यपद्धती पत्रक देण्यात आली . अधिक माहिती साठी संपर्क : श्री . अमित उदय आठवले जिल्हा उपव्यवस्थापक पालघर .९११२२२६५३०/ ९९७५११७८०७
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment