दिनांक १५ व १६ ऑगस्ट रोजी अमृतपेठचे आयोजन
नाशिक येथे अमृतपेठचे आयोजन.
भव्य दिव्य असे दर्जेदार वस्तू आणि स्वादिष्ट पदार्थ यांचे प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शन. दिनांक १५ व १६ ऑगस्ट म्हणजे शनिवार आणि रविवार या दिवशी अमृतपेठ आयोजन आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी आहे.
स्थळ : सुदर्शन हॉल, इंदिरानगर - पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक.
तेव्हा नक्की या आणि भरपूर खरेदी करा. स्वदेशी आणि स्थानिक उत्पादन विक्रीस हातभार लावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7887615377
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment