अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे अमृत संस्थे-अंतर्गत अमृत पेठचे आयोजन.
अहिल्यानगर :- कोपरगाव येथे १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी लघु-उद्योजकांसाठी आपली उत्पादने सादर करण्यासाठी तसेच स्वदेशी व दर्जेदार उत्पादन खरेदी साठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेअंतर्गत अमृतपेठचे आयोजन करण्यात आले आहे.येथे विविध स्टॉल उपलब्ध असून शासकीय योजना माहिती स्टॉल ही असणार आहे.
या अमृत पेठ चे उदघाटन समारंभ शनिवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
हे उदघाटन माननीय आमदार श्री. विवेकभैय्या कोल्हे (सदस्य, विधानपरिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार आहे ,तसेच मा. पराग संधान (नगराध्यक्ष-कोपरगाव नगरपालिका),मा.श्री. संजय वसंतराव सातभाई(माजी नगराध्यक्ष - कोपरगाव नगरपालिका),मा.श्री. सत्येन मुंदडा(माजी चेअरमन, द पिल्स को. ऑप. बँक) मा.श्री.प्रसाद नाईक (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, कोपरगाव), मा. मकरंद कोल्हाळकर सर(अध्यक्ष-कोपरगाव ब्राह्मण सभा),मा. मंगेश खाडिलकर (विभागीय व्यवस्थापक-अमृत संस्था) ,मा. सागर भोपे (जिल्हा व्यवस्थापक-अमृत संस्था )हे उपस्थित असणार आहेत. दर्जेदार व स्वदेशी खरेदीसाठी कोपरगाव व परिसरातील समाज बांधव व भगिनी यांनी कुटूंबासह अवश्य भेट द्या.
दिनांक: १५ ऑगस्ट २०२६ रोजी वेळः दुपारी ४ वाजता स्थळ: व्यापारी धर्मशाला, बस स्टॅन्ड समोर, कोपरगाव, अहिल्यानगर
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment