शिक्रापुर (जि.पुणे) येथील श्री काळभैरवनाथ महाविद्यालयात अमृत पराक्रम दिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांची दिली माहिती

येथील श्री काळभैरवनाथ महाविद्यालयामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (गतीविधी) जिल्हा प्रमुख आणि बाबुराव दौंडकर स्मारक समिती (रांजणगाव) चे श्री. विठ्ठल वाघ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

शिक्रापुर (जि.पुणे) येथील श्री काळभैरवनाथ महाविद्यालयात  अमृत पराक्रम दिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांची दिली माहिती  मुख्य फोटो
शिक्रापुर (जि.पुणे) येथील श्री काळभैरवनाथ महाविद्यालयात  अमृत पराक्रम दिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांची दिली माहिती  अतिरिक्त फोटो

येथील श्री काळभैरवनाथ महाविद्यालयामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (गतीविधी) जिल्हा प्रमुख आणि बाबुराव दौंडकर स्मारक समिती (रांजणगाव) चे श्री. विठ्ठल वाघ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

अमृत संस्थेच्या उपक्रमांची माहिती कार्यक्रमाची प्रस्तावना अमृत मित्र श्री. कमलाकर कुलकर्णी यांनी केली. त्यांनी उपस्थितांना 'अमृत संस्थे'विषयी सविस्तर माहिती दिली.

संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि दुर्गोत्सव 2025 दुर्गोत्सवाचे महत्त्व त्यांनी सांगितले.

तसेच, यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अर्थात अमृत पराक्रम दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि 'रील' (Reels) स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये कसा सहभाग नोंदवावा, याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.

प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन व मुक्त संवादप्रमुख वक्ते श्री. विठ्ठल वाघ यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा इतिहास आणि त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला.

त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट मुक्त संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले. आजच्या डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व किती आहे, हे सांगतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहास समजून घेण्याचे व त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गणेश खेडकर यांनी प्रमुख वक्ते श्री. विठ्ठल वाघ यांचे मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६७

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:59 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:59 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement