रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था आणि पेण ब्राह्मण सभेतर्फे महारुद्र अनुष्ठान

अमृत संस्थेच्या योजनांची ब्रह्मवृंदाला देण्यात आली माहिती

रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था आणि पेण ब्राह्मण सभेतर्फे महारुद्र अनुष्ठान मुख्य फोटो
रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था आणि पेण ब्राह्मण सभेतर्फे महारुद्र अनुष्ठान अतिरिक्त फोटो

पेण : रायगड जिल्हा ब्राह्मण संस्था आणि पेण ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने महारुद्र अनुष्ठान कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून ब्रह्मवृंद उपस्थित होते. अनेक दिवसांपासून या अनुष्ठानाचे नियोजन करण्यात आले होते.

ब्राह्मण समाज एकत्र यावा, सामूहिक उपक्रमांद्वारे परस्पर संवाद व विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा उद्देश कार्यक्रमाच्या आयोजनामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व ब्रह्मवृंद, सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानण्यात आले.

या वेळी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ब्रह्मवृंदाला देण्यात आली. संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना चांगल्या असल्याचे मत या वेळी व्यक्त झाले. त्या योजनांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 30-11-2025 News publication date | Time: 10:44 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 30-11-2025 News publication date | Time: 10:44 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words