चंद्रपूर येथील सोमय्या पॉलिटेक्निक मध्ये मा.जगन्नाथ लडकत यांनी उलगडला थोरल्या बाजीरावांच्या शौर्यगाथांचा इतिहास

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त सोमय्या पॉलिटेक्निक, चंद्रपूर आणि अमृत चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘अजिंक्य योद्धे थोरले बाजीराव पेशवे आणि पालखेडची लढाई’ या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते श्री. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चंद्रपूर येथील सोमय्या पॉलिटेक्निक मध्ये  मा.जगन्नाथ लडकत यांनी उलगडला थोरल्या बाजीरावांच्या शौर्यगाथांचा इतिहास  मुख्य फोटो
चंद्रपूर येथील सोमय्या पॉलिटेक्निक मध्ये  मा.जगन्नाथ लडकत यांनी उलगडला थोरल्या बाजीरावांच्या शौर्यगाथांचा इतिहास  अतिरिक्त फोटो

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री. जगन्नाथ लडकत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एम. झेड. शेख सर, उपप्राचार्य श्री. खुजे सर तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक आदित्य सेंगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य प्रा. एम. झेड. शेख यांनी भारतीय इतिहास लेखनाच्या संदर्भातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर मार्गदर्शन करताना श्री. जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशव्यांच्या युद्धकौशल्याचा, नेतृत्वगुणांचा आणि हिंदवी साम्राज्याच्या विस्तारासाठी त्यांनी केलेल्या विविध मोहिमांचा सविस्तर आढावा घेतला. पालखेडच्या लढाईचे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना त्यांनी बाजीरावांची दूरदृष्टी, वेगवान हालचाली, अचूक रणनीती आणि अद्वितीय युद्धकौशल्य यांचे प्रभावी विवेचन केले. त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर बाजीराव पेशव्यांचे शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वगुण जिवंत झाले. इतिहासाकडे केवळ एक विषय म्हणून न पाहता त्याचे वाचन, चिंतन आणि मनन करून त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला सोमय्या पॉलिटेक्निकमधील सुमारे ४०० विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौशद सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रमजी पांडे यांनी केले. यावेळी अमृत मित्र श्रीरंग खोंड व अमृत मित्र सतीस नारायण दास उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : आदित्य सेंगर जिल्हा व्यवस्थापक

फोन नंबर- 9112228774 जिल्हा कार्यालय पत्ता : कृष्णा टावर जवळ, गुरुद्वारा रोड, तुकूम चंद्रपूर. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:36 PM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:36 PM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

O
Omkar bolte rao
14-08-2026 03:29 PM

किती महान माणूस आहात लडकत जी चंद्रपूर मध्ये भाषण दिले व्वा

Write a Comment
0 / 50 words
Advertisement