बोरिवली, कांदिवलीत लक्ष्यित गटातील व्यक्तींशी गाठीभेटी
मुंबई उपनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून लक्ष्यित गटातील उमेदवारांच्या कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. या उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मुंबई उपनगरातील बोरिवलीत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रणय तीर्थकर यांनी ब्राह्मण वर्गातील सदस्यांची भेट घेतली आणि संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. आशिष कारेकर यांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांबद्दल रुची दाखवली आणि अधिकाधिक लाभार्थी होण्यासाठी संस्थेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रणय तीर्थकर यांनी
तीर्थकर यांनी मुंबई उपनगर कांदिवली येथील उत्तर भारतीय समाजातील सदस्यांचीही भेट घेतली. श्री. उपाध्याय यांच्या माध्यमातून समिती सदस्यांशी चर्चा करण्यात आली. अमृत आयात निर्यात प्रशिक्षण आणि अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण याबद्दल तीर्थकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्या योजनांमध्ये संबंधितांनी रस दाखवला आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment