‘अमृत पराक्रम दिना’ स्पर्धांबाबत लातूर येथील जेएसपीएम संस्थेचा सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या अमृत पराक्रम दिन स्पर्धांबाबत जेएसपीएम महाविद्यालय, लातूरचे उपाध्यक्ष श्री. अजित पाटील कव्हेकर यांना उपक्रमाबाबतचे पत्र देण्यात आले.

‘अमृत पराक्रम दिना’ स्पर्धांबाबत लातूर येथील जेएसपीएम संस्थेचा सकारात्मक प्रतिसाद  मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘अमृत पराक्रम दिना’ निमित्त जेएसपीएम महाविद्यालय, लातूरचे उपाध्यक्ष श्री. अजित पाटील कव्हेकर यांना उपक्रमाबाबतचे पत्र देण्यात आले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अमृत पराक्रम दिना’ अंतर्गत ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, गुरुनाथ मगे व अमोल कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी श्री. अजित पाटील कव्हेकर यांना पराक्रम दिनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, शौर्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी श्री. अजित पाटील कव्हेकर यांनी संस्थेच्या सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘अमृत पराक्रम दिना’च्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्र काढण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे सांगितले. ‘अमृत पराक्रम दिना’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देत त्यांच्या शौर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे

. अधिक माहितीसाठी संपर्क :

शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर

संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 12:55 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 12:55 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement