बीडमध्ये उद्यापासून भव्य "श्रावण महोत्सव २०२६"

स्थानिक उद्योजकांना मोठे व्यासपीठ; नागरिकांनी खरेदीसाठी भेट देण्याचे आवाहन

बीडमध्ये उद्यापासून भव्य "श्रावण महोत्सव २०२६" मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि BBNA बीड यांच्या संयुक्त विद्यमाने "श्रावण महोत्सव २०२६" या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन १४ व १५ ऑगस्ट रोजी अमृत मंगल कार्यालय, बीड येथे करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या महोत्सवात महिला बचत गट, गृहोद्योग, लघुउद्योजक, कारागीर तसेच विविध व्यवसाय व सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत. कपडे, ज्वेलरी, मसाले, राख्या, फराळ, गृहउपयोगी वस्तू, हस्तकला उत्पादने आणि विविध सेवांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अनेक जण घरातून किंवा छोट्या प्रमाणावर चांगला व्यवसाय करत असतात. मात्र त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. अशा उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशाच छोट्या उद्योगांमधून भविष्यात मोठे उद्योजक घडतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते. या महोत्सवाच्या तयारीसाठी अमृत व BBNA चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत असून संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती भेट देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. बीडकर नागरिकांनी कुटुंबासह महोत्सवाला भेट द्यावी, स्थानिक उद्योजकांकडून खरेदी करावी आणि आपल्या जिल्ह्यातील व्यवसायांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 12:19 PM News publication time | Views: 93 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 12:19 PM News publication time | Views: 93 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement