ड्रोन प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हिंगोली : ड्रोन प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच हिंगोली जिल्ह्यातील एक लाभार्थी श्री. अविनाश देशपांडे यांनी अमृत कार्यालय, हिंगोली येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली.
यावेळी लाभार्थ्यास ड्रोन प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, प्रशिक्षणाचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणासाठी असणाऱ्या अटी व निकष तसेच पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
ड्रोन तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये वाढता वापर लक्षात घेता, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य प्राप्त करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
लाभार्थ्याने सादर केलेल्या कागदपत्रांची आवश्यक पडताळणी करून प्रशिक्षणाच्या पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी अशा कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क-७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment