येथील पीएम श्री जिल्हापरिषद प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळा नायगांव मधे 'अमृत पराक्रम दिन' स्पर्धेची माहिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पीएम श्री जिल्हापरिषद प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळा नायगांव मधे 'अमृत पराक्रम दिन' स्पर्धेची माहिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नायगांव: महाराष्ट्र शासन व 'अमृत' संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अमृत पराक्रम दिन' उपक्रमाअंतर्गत आज अमृत टीम नांदेडच्या वतीने 'पिएम श्री जिल्हापरिषद प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळा नायगांव मधे' सकाळी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा व ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धांची माहिती या वेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमात अमृत नांदेडचे जिल्हा ऊपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी विद्यार्थ्यीनींशी थेट संवाद साधत 'अमृत पराक्रम दिना'चे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरावर निबंध लेखन, वक्तृत्व आणि रील्स/शॉर्ट्स मेकिंग या तीन विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांचाळ सर, श्री. साईनाथ कुलकर्णी सर, श्री.खडकीकर सर, सौ.देशमुख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्याची प्रेरणा घेत विद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थी या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील, अशी ग्वाही या वेळी शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment