अमृत संवाद सेतूच्या माध्यमातून अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची तहसील कार्यालयास भेट

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमांतर्गत महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय, अमरावती येथे भेट देऊन प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.

अमृत संवाद सेतूच्या माध्यमातून अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची तहसील कार्यालयास भेट मुख्य फोटो
अमृत संवाद सेतूच्या माध्यमातून अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची तहसील कार्यालयास भेट अतिरिक्त फोटो

यावेळी नायब तहसीलदार माननीय अशोक कालीवकर साहेब यांनी विद्यार्थिनींना तहसील अमरावतीतील विविध विभागांचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा तसेच विविध प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय दाखले व कागदपत्रांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. शासकीय कार्यालयाची कार्यपद्धती, नागरिकांनी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच प्रशासनाशी प्रभावी संवाद याबाबत विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थिनींना तहसील अमरावतीची कार्यपद्धती व शासन व्यवस्था प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाली. यावेळी नायब तहसीलदार अशोक कालीवकर साहेब यांनी ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनींनी प्रशासन समजून घेण्याबरोबरच जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखावी, असे आवाहन केले. तसेच या उपक्रमासाठी अमृत संस्थेचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास अमृतचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर तसेच महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शर्मिला देशमुख, प्रा. डॉ. गोपाल घुमटकर यांची उपस्थिती होती. ‘अमृत संवाद सेतूच्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील संवादाची दरी कमी करून प्रशासनाची समज, नागरिकत्वाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तहसील अमरावतीला दिलेली ही भेट विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३५

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 12-08-2026 News publication date | Time: 07:53 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: साक्षी कुळकर्णी News publisher name | Date: 12-08-2026 News publication date | Time: 07:53 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement