यवतमाळ येथे १२ ऑगस्ट रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यवतमाळ येथे १२ ऑगस्ट रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. धनंजय जी. पांडे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते श्री. जगन्नाथ लडकत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षित शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी भारतीय इतिहास लेखनाच्या संदर्भातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती उपस्थितांना करून दिली. “अजिंक्य योद्धे थोरले बाजीराव पेशवे आणि पालखेडची लढाई” या विषयावर मार्गदर्शन करताना समर्थ पुणे परिवाराचे संस्थापक व संस्कृती प्रतिष्ठान, पुणेचे मुख्य विश्वस्त श्री. जगन्नाथ लडकत यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धकौशल्याचा, नेतृत्वगुणांचा आणि हिंदवी साम्राज्य विस्तारासाठी त्यांनी केलेल्या विविध मोहिमांचा सविस्तर आढावा घेतला. पालखेडच्या लढाईचे ऐतिहासिक संदर्भ, बाजीरावांची रणनीती आणि अद्वितीय युद्धकौशल्य यांचे प्रभावी विवेचन करत त्यांनी विद्यार्थिनींमध्ये इतिहासाविषयी कुतूहल आणि अभिमान निर्माण केला. अध्यक्षीय मनोगतात श्री. धनंजय पांडे यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अलौकिक कर्तृत्वातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी इतिहासाचे वाचन, चिंतन आणि मनन करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली सरोदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नारायण वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. कविता तातेड, सांस्कृतिक समिती सदस्य डॉ. सरिता देशमुख, प्रा. मोनाली सलामे, प्रा. सपना दाढे, प्रीती तिवाडे, नितीन वालदे व वैभव चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सुमारे ६५० विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरले. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक फोन नंबर- ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Dinkar deshpande
I like this program. It very important to our new generation .
Write a Comment