अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण घ्या; आत्मनिर्भर व्हा

अमृत संस्थेतर्फे बुलढाण्यातील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नावनोंदणी सुरू

अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण घ्या; आत्मनिर्भर व्हा मुख्य फोटो
मुख्य फोटो

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगावमधील रजतनगरी येथे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येत असून, ज्यांना यापूर्वी कोणतीही शासकीय योजना किंवा महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही अशा युवक-युवतींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात संबंधित व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना आत्मविश्वासासह स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणार आहे.

या योजनेचा लाभ ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, राजपूत, कोमटी, कायस्थ, गुप्ता, नायर, नायडू, ठाकूर, बंगाली, सिंधी, तसेच खुल्या प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी खामगाव व परिसरातील पात्र युवक-युवतींना पुढे येण्याचे आवाहन केले असून, “स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण ही काळाची गरज आहे आणि अमृत संस्था ही संधी सर्वांसाठी खुली करत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (TC), उत्पन्न दाखला (कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे), अधिवास (डोमिसाइल) दाखला, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

पत्ता :
फ्लॅट नं. ३०५, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा
मोबाइल :
9112227637, 8308989222
जिग्नेश कमानी, बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 09:18 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 09:18 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words