इतिहास अभ्यासक आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या मामांचे वंशज मा. चंद्रशेखर बर्वे यांनी सांगितल्या अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या शौर्यगाथा
के. बी. एच. एस. एस. ट्रस्टचे इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, मालेगाव येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मा. चंद्रशेखर बर्वे यांनी विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा आणि पराक्रमाचा इतिहास रंजक पद्धतीने सांगितला.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. व्याख्यानात त्यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे अनेक गुणविशेष सांगितले. उपस्थितांना त्यांच्या अनेक पैलूंचा परिचय करून दिला.
यावेळी कॉलेजचे पदाधिकारी,प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवस्थापक दीपक गुप्ता आणि अमृत मित्र अजिंक्य कन्नल यांनी केले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment