श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त ‘अमृत पराक्रम दिन’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जय क्रांती महाविद्यालयाचे उपप्राचार्य नाबदे सर यांनी विद्यार्थ्यांना ‘अमृत पराक्रम दिना’ची माहिती देत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
लातूर,: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त ‘अमृत पराक्रम दिन’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जय क्रांती महाविद्यालयाचे उपप्राचार्य नाबदे सर यांनी विद्यार्थ्यांना ‘अमृत पराक्रम दिना’ची माहिती देत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची सविस्तर माहिती दिली. ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, लेखन आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि ‘अमृत पराक्रम दिन’ उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment