येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण रोड येथे नुकतेच 'अमृत वर्गाचे' अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शाळेतील लहान मुलांसाठी शारीरिक व्यायाम आणि विविध बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण रोड येथे नुकतेच 'अमृत वर्गाचे' अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शाळेतील लहान मुलांसाठी शारीरिक व्यायाम आणि विविध बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अमृत वर्गाचे आयोजन करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका सौ. मांढरे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्याच पुढाकारातून आणि मोलाच्या सहकार्यातून हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
या अमृत वर्गादरम्यान उपस्थित लहान मुलांना निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून देत विविध सोपे व्यायामप्रकार करून घेण्यात आले.
तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी विविध रंजक आणि आव्हानात्मक बौद्धिक खेळ खेळण्यात आले.
या खेळांमुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले. सौ. मांढरे मॅडम यांच्या या मार्गदर्शनाबद्दल आणि सक्रिय सहभागाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे विशेष कौतुक व आभार मानले जात आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६७
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment