मराठवाडा हायस्कूल, परभणी येथे आज अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘अमृत वर्ग मध्ये गीत , बौद्धिक खेळ, घोषणा घेण्यात आल्या.तसेच पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
परभणी : मराठवाडा हायस्कूल, परभणी येथे आज अमृत वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘अमृत वर्ग मध्ये गीत , बौद्धिक खेळ घेण्यात आले व घोषणा देण्यात आल्या.तसेच अमृत पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी निबंध स्पर्धेची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व जास्तीत जास्त नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या विचारांपासून आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमापासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
या अमृत वर्गास अमृत परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, अमृत मित्र अनंत जोगदंड आणि अमृत सखी मयुरी टेळकीकर यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पराक्रम दिन व निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत निबंध स्पर्धेत सहभागी होण्याची उत्सुकता व्यक्त केली. नाव नोंदणीची प्रक्रिया विद्यार्थ्यांना विस्तारपूर्वक सांगण्यात आली. नोंदणी प्रक्रियेस अडचण आली तर अमृत जिल्हा कार्यालय परभणी संपर्क साधावा असे आवाहन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment