अमृत पराक्रम दिन’ निमित्त ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्या स्पर्धांच्या माहितीबाबत नुकतीच राजर्षी शाहू जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेट दिली व त्यांना या स्पर्धेचे निवेदन दिले.
लातूर, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिन’ निमित्त ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी राजर्षी शाहू जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य श्री. सचिन कुलकर्णी यांना स्पर्धांबाबतचे पत्र देण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम व राष्ट्रनिष्ठेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी व अमृत मित्र अमित पांडे यांनी प्राचार्य सचिन कुलकर्णी यांची भेट घेऊन स्पर्धांबाबत सविस्तर माहिती दिली व पत्र सुपूर्द केले. महाविद्यालयाच्या वतीने या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment