महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट

अमृतच्या कार्याचे मंत्री मा. संजय सावकारे यांनी केले कौतुक; युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन.

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट  मुख्य फोटो
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट  अतिरिक्त फोटो

अमृतच्या कार्याचे मंत्री संजय सावकारे यांनी केले कौतुक; युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन. सिल्लोड : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांची छत्रपती संभाजीनगर येथील अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी योजनांची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली.

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, रोजगारक्षम कौशल्य विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास तसेच वैयक्तिक व्याज परतावा योजना यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश होता. यावेळी अमृतच्या योजनांची माहिती असलेली पुस्तिका मंत्री महोदयांना भेट देण्यात आली.

तसेच अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या संकल्पनेची माहिती, विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल, संस्कार, स्वावलंबन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याचे महत्त्व याविषयीही सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी सांगितले की, अमृतच्या माध्यमातून ‘अमृत संवाद सेतू ’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हा पहिला कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाची छायाचित्रे तसेच माननीय तहसीलदार यांची प्रतिक्रिया मंत्री महोदयांना दाखविण्यात आली. मंत्री महोदयांची प्रतिक्रिया मा. ना. श्री. संजयजी सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य - “अमृतचे कार्य अतिशय चांगले आणि समाजासाठी उपयुक्त आहे. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत. विशेषतः ‘अमृत संवाद सेतू ’मुळे युवक आणि शासन यांच्यात चांगला संवाद निर्माण होण्यास मदत होत आहे. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. अमृतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी, आणि संपूर्ण टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.”


अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 09:09 PM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 09:09 PM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement