देगलूरमध्ये अमृत संस्थेतर्फे मोफत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम

नवीन वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी!; लवकरात लवकर नावनोंदणीचे आवाहन

देगलूरमध्ये अमृत संस्थेतर्फे मोफत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

नांदेड : देगलूर (जि. नांदेड) येथील तरुण-तरुणी आणि महिलांसाठी एक खूशखबर आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी प्रॉडक्ट्स बनवण्याचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात नवी कौशल्यप्राप्ती करून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनण्याची सुवर्णसंधी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांना मिळणार आहे. लक्ष्यित गटात समाविष्ट असलेल्या जातींबद्दलची माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे.

या प्रशिक्षणात ​विविध प्रकारचे केक, बिस्किट्स, कुकीज आणि पाव बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, ​कच्चा माल खरेदी आणि मशिनरीची माहितीही दिली जाईल. एवढेच नव्हे, तर एफएसएसएआय नोंदणी, उद्यम नोंदणी, ​पॅकेजिंग आणि मार्केटिंग या अत्यंत महत्त्वाच्या बाबीही या प्रशिक्षणात शिकवल्या जाणार आहेत. हे प्रशिक्षण १८ दिवसांचे निवासी स्वरूपाचे आणि पूर्णतः निःशुल्क आहे. शासकीय योजनांची माहितीही यात दिली जाणार असून, त्याचा उपयोग उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करताना होणार आहे. या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार असून, मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेशासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास, कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय प्रमाणपत्र मिळणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला (खुल्या प्रवर्गातील असल्याचा उल्लेख), पॅन कार्ड, अधिवास दाखला (डोमिसाइल सर्टिफिकेट), उत्पन्न प्रमाणपत्र (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक)

संपर्क :
सौरभ कुलकर्णी 7083868522
नांदेड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
विश्वेश्वर जोशी - 8600240032
नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
सौ. मनीषा कुनसावळीकर - 9420668752
विश्वजित कांबळे - 7058123706

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 08:26 AM News publication time | Views: 120 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 08:26 AM News publication time | Views: 120 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words