श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘पराक्रम दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेतर्फे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाची माहिती देण्यासाठी अमृत सखी सौ.गौरी कुलकर्णी यांनी सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री. गोसावी सर यांची भेट घेऊन माहिती पत्र दिले. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘पराक्रम दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने अमृत संस्थेच्या वतीने सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री. गोसावी सर यांची भेट घेऊन ‘पराक्रम दिना’चे माहिती पत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेच्या सर्व शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा यासाठी संस्थेने प्रयत्न करावे, अशी अमृत कडून विनंती करण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क-
९११२२२८७६६ / ७०५७६०७४१९/७९७२८३०७५७
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६ अमृत संस्थेविषयी - अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment