महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृतपेठ या उपक्रमाचे वर्धा येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. वर्धा जिल्ह्यासाठी हा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून, नागरिकांचा तसेच स्टॉलधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृतपेठ या उपक्रमाचे वर्धा येथे यशस्वी आयोजन ८ आणि ९ ऑगस्ट ला करण्यात आले. वर्धा जिल्ह्यासाठी हा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून, नागरिकांचा तसेच स्टॉलधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपव्यवस्थापक मा. धनंजय कुलकर्णी, माहेश्वरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक धर्मेंद्रजी मुंदडा, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष मोहनजी गौरशेट्टीवर तसेच सिंधी समाजाचे अध्यक्ष कन्हैयालाल चैनानी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे यांनी प्रास्ताविक केले आणि अमृतपेठ थेट बाजारपेठ यांचा उद्देश समजून सांगितला तसेच अमृत संस्थेच्या योजना सांगितल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत सखी शांभवी पाचखेडे यांनी केले. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉल ला भेट देत भरघोस खरेदी केली. अमृतपेठ उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा संघचालक जेठानंदजी राजपूत यांनी उपस्थित राहून प्रत्येक स्टॉलला भेट दिली. त्यांनी स्टॉलधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली तसेच त्यांना प्रोत्साहन दिले तसेच ब्राह्मण सभेचे मधुकरजी जोशी यांनी सुद्धा प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि संवाद साधत प्रोत्साहन दिले. अमरावती विभागीय व्यवस्थापक मा. प्रवीण कोळेश्वर यांनी उपस्थित राहून स्टॉलधारकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक आदित्य सेंगर, भंडारा जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास आणि अमरावती जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर यांनी उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य व प्रोत्साहन दिले. अमृतपेठ हा उपक्रम केवळ विक्रीचा मंच न राहता, विविध उद्योजक, महिला, कारागीर व स्टॉलधारकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment